मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांचा मुंबईतील वांद्रे परिसरात गोळीबारात जखमी होऊन मृत्यू झाला. लीलावती रुग्णालयात बाबा सिद्दिकी यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच तीन व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. मुंबईच्या वांद्रे पूर्व या भागातील खैरनगर परिसरात ही घटना घडली.
बाबा सिद्दिकी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी हा देखील आमदार असून मुंबई युवक काँग्रेसची अध्यक्षपद त्याच्याकडे होते. 66 वर्षे बाबा सिद्दिकी हे तीन वेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार राहिले त्यांचा मुलगा दिशान हा वांद्रे पूर्व या भागाचा आमदार आहे.
चार वर्षांपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्यावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर 2019 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. दत्त कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून सिद्दिकी ओळखले जात होते. 1999, 2004 व 2009 या काळात ते आमदार होते, तर आघाडी सरकारच्या वेळेस म्हणजे 2004 ते 2008 या दरम्यान ते राज्यात मंत्री देखील होते..











