सोमेश्वरनगर : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वरनगर व सोमेश्वर स्पोर्टस अकॅडमी यांच्या वतीने परिसरातील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या गुणवंताचा सत्कार करीत ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे राज्य समन्वयक किरण आळंदीकर, उद्योजक दीपक साखरे, उद्योजक राजकुमार दुर्वे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड आदी यावेळी हजर होते. संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर व उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, रामचंद्र शेलार यांनी उपस्थितांचे स्वागत केले .
प्रास्ताविकामध्ये संघटनेचे तक्रार निवारण समिती अध्यक्ष व सचिव ऍड. गणेश आळंदीकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते अतिशय संघर्षातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या पूजा नाथा करचे-होळकर, पूजा राहुल चौगुले यांचा, जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक (कॅनॉल इन्स्पेक्टर) पदी निवड झालेल्या रेश्मा दिलीप गायकवाड-जाधव, स्थापत्य सहायक अभियंता पदी निवड झालेल्या शुभांगी हाके, आकांक्षा हुंबरे, बारामती सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल किरण आळंदीकर, पोलीस उपनिरीक्षक युवराज गडदरे, सोमेश्वर कारखान्यातून सेवा निवृत्त झालेले लेबर व वेल्फेअर ऑफीसर दत्ता माळशिकारे, सहायक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झालेले पांडुरंग कन्हेरे, राज्य राखीव पोलीस दलात सेवानिवृत्ती नंतर भरती झालेले नितीन शेंडकर आदींचा सत्कार करणेत आला.
सत्काराला उत्तर देताना पूजा कर्चे, रेश्मा गायकवाड, पूजा चौगुले यानी यशाचे रहस्य सांगताना अभ्यास चिकाटीने केला, तर यश नक्की मिळते असे सांगितले. किरण आळंदीकर, दीपक साखरे व राजकुमार धूर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.
सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी आपण गेली पाच वर्ष या संघटनेचे निरपेक्ष काम पाहत असून प्रत्येक वेळी मोठी पदरमोड करून जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सामाजिक कार्य करत असून आपण संघटनेला 25 हजार रुपये देणगी देत असून सदर रक्कम ठेव म्हणून ठेवून त्याची व्याजदरातून गुणवंतांचे सत्कार नियमित करण्यात यावेत असे मत व्यक्त केले.
यावेळी सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, सोपान गायकवाड, सैनिक संघटनेचे सदस्य राजाराम शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, किरण सोरटे, रवींद्र कोरडे, विक्रम लकडे, मोहन शेंडकर,राजेंद्र पवार, ताराचंद शेंडकर, अशोक रासकर, संजय पडवळ, सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे संस्थापक सदस्य गणेश आळंदीकर यानी केले तर आभार उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यानी मानले.











