• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खोटे प्रतिज्ञापत्र! बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

tdadmin by tdadmin
July 19, 2024
in सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
खोटे प्रतिज्ञापत्र! बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

राज्यातील सहकारातील पहिले प्रकरण..

बारामती : महान्यूज लाईव्ह

सहकाराची पंढरी म्हणणाऱ्या बारामतीत न्यायालयाला दखल घ्यावी लागली आणि न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालका विरोधात थकबाकीदार असतानाही सहकारी संस्थेची निवडणूक लढवली व खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले या कारणावरून बारामतीच्या न्यायालयाने विनायक महादेव गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

 त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात विनायक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे बारामती सहकारी बँकेने गावडे यांना दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे आहे की खरे? यावरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, थकबाकीदार असताना बँकेने थकबाकी नसल्याचा दाखला कसा दिला? यावरूनही नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याची थोडक्यात माहिती अशी, विनायक गावडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वीच बारामती सहकारी बँकेकडून 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.  1 मार्च 2021 पासून ते बँकेचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप गुणवडी तालुका बारामती येथील श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांनी घेतला होता. 

या सोसायटीची निवडणूक जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी कृष्णाजी उर्फ कालिदास आनंदराव गावडे यांनी त्यास आक्षेप घेतला. सहकारी संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम 1960 च्या कलम 73 क नुसार कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये थकबाकीदार नसलेल्या सदस्यालाच सहकारी सोसायटीची निवडणूक लढवता येते, हा कायदा असूनही थकबाकीदार असताना विनायक गावडे निवडणूक लढवत होते, म्हणून कालिदास गावडे यांनी आक्षेप घेतला होता. 

मात्र यावेळी विनायक गावडे यांनी बारामती सहकारी बँकेचा एक लेटरपॅड असलेला दाखला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दाखवला. यामध्ये बँकेच्या व्यवस्थापकाची स्वाक्षरी व बँकेचा शिक्का होता व त्यावरती विनायक गावडे यांच्याकडे थकबाकी नसल्याचा दाखला देण्यात आला होता. 

या पत्रामुळे त्यांचा आक्षेप रद्द झाला आणि त्यांनी निवडणूक लढवली व त्यानंतर त्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची देखील निवडणूक लढवली. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ते निवडून आले. या सोसायटीत निवडून आले.

मात्र त्यानंतर बारामती येथील सहाय्यक निबंधकांनी विनायक महादेव गावडे यांच्यावर 27 सप्टेंबर 2022 रोजी कलम 101 अंतर्गत बारामती सहकारी बँकेच्या कर्जासंदर्भात अंतर्गत वसुलीची कारवाई केली त्यानंतर 17 नोव्हेंबर 2022 रोजी कलम 156 अंतर्गत जप्तीची देखील कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र हे खोटे असल्याचा दावा कृष्णाजी उर्फ कालिदास आनंदराव गावडे यांनी केला. 

त्यावरून कृष्णाजी उर्फ कालिदास गावडे यांनी बारामतीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अॅड. अमर काळे यांच्या वतीने यामध्ये युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयात मांडलेल्या कागदपत्रानुसार प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखलपात्र व गंभीर स्वरूपाचा असल्याचे मत नोंदवत न्यायाधीश श्रीमती डी. पी. पुजारी यांनी विनायक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बारामती पोलिसांना दिले. त्यानुसार बारामती पोलिसांनी विनायक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे बारामती शहर पोलीस ठाण्यात कृष्णाजी उर्फ कालिदास आनंदराव गावडे यांच्या फिर्यादीवरून विनायक महादेव गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रीदत्त विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था गुणवडी यामध्ये सभासद असलेल्या कृष्णाजी उर्फ कालिदास आनंदराव गावडे यांनी तक्रार केली असून त्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

Next Post
पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सूर्या थत्तु ‘घाटाचा राजा’ तर एअर फोर्सचा मनजित सिंग ठरला राष्ट्रीय विजेता!

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सूर्या थत्तु 'घाटाचा राजा' तर एअर फोर्सचा मनजित सिंग ठरला राष्ट्रीय विजेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group