बारामती : महान्यूज लाईव्ह
पंढरीची वारी आयुष्यातून एकदा तरी करावी असं प्रत्येकालाच वाटतं. प्रबोधनकार कीर्तनकार शामसुंदर सोन्नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवस तरी वारी अनुभवावी अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम सुरू केला होता. गेली 11 वर्ष हा उपक्रम सुरू असून यंदा या उपक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बारामती ते सनसर या पालखी सोहळ्याच्या मार्गात पायी वारीचा अनुभव घेणार आहेत.
शरद पवार यांच्यासह जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचाही सहभाग राहणार आहे.
शामसुंदर महाराज सोन्नर यांच्यासह त्यांचे सहकारी शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने हा एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम राबवला जातो सात जुलै रोजी या उपक्रमांतर्गत बारामती ते संसर हे अंतर ही सर्व मंडळी चालणार आहेत. या संदर्भात शरद पवार यांना त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शामसुंदर महाराज सोन्नर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेऊन या संदर्भात माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी या उपक्रमात मी यंदा सहभागी होणार असल्याची माहिती











