दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे १ ते १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या उसाच्या बीलापोटीची प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
शिंदे यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे, या प्रत्रकात नमूद केले आहे की, कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. आज (दि. १३) डिसेंबरमध्ये १ ते १५ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बील १६ कोटी ७६ लाख ८१२ रूपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.
साखरेच्या भावामध्ये चढ-उतार तसेच साखरेस उठाव नसल्याने संचालक मंडळास बीले देण्यास विलंब होत आहे. मात्र उर्वरित पंधरवड्यांची बीलेही लवकरात लवकर जमा करणार असून सभासदांनी आतपर्यंत जो संयम व विश्वास संचालक मंडळावर दाखविला आहे, त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने आभारही उपाध्यक्ष शिंदे यांनी मानले आहेत.











