महान्यूज वेदर रिपोर्ट
जानेवारीनंतर फेब्रुवारीमध्ये देशील अवकाळी पावसाचा तडाखा महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वातावरणामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये 29 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील 11 जिल्हे आणि मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये या पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी हवामान कोरडे राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने अंदाज 24 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान वर्तवला आहे.
24 तासात देशाच्या विविध राज्यांमध्ये देखील हा पाऊस होणार असून, 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी जोरदार वादळी वारा आणि गारपीटही होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.











