बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती ॲग्रोच्या महाराष्ट्रातील विविध ऑफिसवर आज सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली. दरम्यान बारामती शहरात आणखी दोन उद्योजकांवर ईडीने छापेमारी केली असून, या ठिकाणी चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधकांकडून सातत्याने होत रोहित पवार यांच्या कारखान्याची चौकशी होणार असे सांगितले जात होते. ते वाक्य खरे ठरवताना आज सकाळी आठ वाजल्यापासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दरम्यान बारामती ग्रुपच्या मुंबई व पुणे आणि बारामतीसह सहा ठिकाणच्या कार्यालयांवर ही छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. त्यावर तत्परतेने ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. कारखाना लिलाव प्रक्रियेत मॅन्युप्युलेशन झाल्याचा आरोप करत सोमय्यांनी रोहित पवारांना टार्गेट केले होते आज केंद्रीय यंत्रणेने छापे मारले आणि सोमय्यांचे म्हणणे खरे झाले.
दरम्यान आज बारामती बारामती ऍग्रोच्या कार्यालयाखेरीज राजेंद्र इंगवले व संजय आवटे या दोघांचीही चौकशी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.











