इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मराठवाड्याच्या सात टीएमसी पाण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा जलस्थिरीकरणाच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात इंदापूर तालुक्यातील दोन शेतकरी उतरले आणि दोघेही आत कोसळले अशी माहिती मिळत असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी ते तावशी हे अंतर नीरा आणि भीमा नदी जोडण्याच्या कामाकरता बोगद्याचे काम सुरू आहे. तेथे हे शेतकरी पडले अशी माहिती मिळत असून सध्या या बोगद्यातील पाणी कमी झाले असून इंदापूर तालुक्यातील काझड येथील हे दोन शेतकरी खाली उतरत होते.
मात्र त्यांचा दोघेही आत कोसळले. ही घटना घडल्यानंतर आता बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधण्यात आला असून, मोठ्या ट्रेनच्या साह्याने या दोघांचा शोध घेतला जाणार आहे. अनिल नरूटे व रतीलाल नरूटे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून त्यांचा शोध घेतला जात आहे.











