मुंबई : महान्यूज लाईव्ह
ओबीसी व मराठा आरक्षणाच्या विषयात आता मंत्री छगन भुजबळ आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यातच जुंपली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना तर छगन भुजबळ यांनी मनोज रंग यांना लक्ष्य केले आहे. आज ओबीसीच्या जालना येथे झालेल्या यलगार सभेत छगन भुजबळ आणि थेट मनोज जरांगे पाटील यांना इशारा देताना माझ्या शेपटीवर पाय देऊ नको, मी कष्टाचा खातो, तुझ्यासारखा सासऱ्याच्या जीवावर खात नाही असा टोला लगावला, त्याला मनोज जरांगे पाटील यांनी वर्मी घाव बसेल असा प्रतिटोला दिला आहे.
आज ओबीसींच्या एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज पाटील यांना जरांगे पाटील यांना लक्ष करताना याद राख माझ्या शेपटीवर पाहिजे चा प्रयत्न करू नकोस असा थेट इशारा दिला आंदोलनादरम्यान भेटायला गेलेले निवृत्ती न्यायमूर्ती त्याला जर सर म्हणत असतील तर तो पाचवी तरी पास आहे का यात्रा शेपटीवर परत फायद्याचा प्रयत्न करू नकोस हा काही पहिला आणि शेवटचा मेळावा नाही आता प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ओबीसींचे मिळाले होतील ओबीसींची संख्या जास्त असूनही महाराष्ट्रात बिहारप्रमाणे जातीय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी भुजबळ यांनी केली.
अंतरवाली सराटी मध्ये पोलिसांनी केलेला लाठीमार सगळ्यांनी पाहिला, पण सत्तर पोलीस जखमी झालेले कोणीच पाहिले नाहीत. पोलिसांना मारण्यासाठी जरांगे पाटील यांनी सर्व तयारी केली होती. पोलिसांवर दगडाचा मारा केला होता. लाठीमार झाल्यानंतर जरांगे घरात जाऊन बसले अशी ही टीका छगन भुजबळ यांनी केली.
त्याला प्रतिउत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर खरमरीत टीका केली. ते म्हणाले, लोकांचे खाल्ल्यानेच तुम्ही आतमध्ये जाऊन आलेला आहात. कोण कुणाचे खात आहे हे सर्वांना माहित आहे. आमच्यावर तुम्ही टीका केली तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही काही कच्चे नाही, पण महाराष्ट्रातलं वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाही. आम्ही देखील 50 टक्के आहोत, हे विसरू नका. तुम्ही लोकांचे पैसे खाता. रक्त पिता, मग तुम्हाला कोण देव म्हणणार आहे? वयाने तुम्ही मोठे आहात. आम्हाला तुमची माहिती बाहेर काढायला लावू नका. आम्ही देखील तुमचा बायोडाटा काढला आहे असे जरांगे पाटील म्हणाले.











