सासवड : महान्यूज लाईव्ह
लग्न झाल्यानंतर आपल्याकडे कुलदैवताचे दर्शन घेण्याची प्रथा आहे त्यानुसार पुण्यातील धायरी येथून एक नवदांपत्य पाच जणांसहरीक्षाने जेजुरी येथे देवदर्शनासाठी आले होते मात्र ब्रेक फेल झाल्यामुळे परीक्षा रस्त्यापासून दीडशे फूट अंतरावर असलेल्या विहिरीत पडली.
या अपघातात श्रावणी संदीप शेलार (वय सतरा वर्ष), रोहित विलास शेलार (वय 23 वर्ष), वैष्णवी रोहित पवार शेलार (वय अठरा वर्ष) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आदित्य मधुकर घोलप (वय 22 वर्षे) आणि शितल संदीप शेलार (वय 35 वर्षे सर्व रा. धायरेश्वर मंदिर जवळ धायरी पुणे) या दोघांना वाचवण्यात आलं आहे.
पुण्यातील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवड जवळ विहिरीत पडली.
धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेली ही रिक्षा सासवडनजीक बोरावकेमळा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. सोमवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. दरम्यान घरून निघाल्यानंतर सासवड पर्यंत संपर्क असलेल्या या नवविवहितांचा आणि रिक्षातील असलेल्या इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबीय असलेला संपर्क त्यानंतर तुटला होता.
आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून वाचवा वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. सासवड पोलिसांनी दोघांना सुखरूप बाहेर काढलय. मात्र हे नवदांपत्य आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.