दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र तसेच परराज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव काळूबाई देवीच्या मंदिरात हे २१ सप्टेंबर २३ (गुरुवार) पासून २८ सप्टेंबर २३ पर्यंत देवीच्या मुळ गाभाऱ्यात दर्शन बंद राहणार आहे.
गाभाऱ्यातील दुरूस्तीचे तसेच गर्भ मंदिर संपूर्ण चांदीचे बनवण्याचे काम देवस्थान ट्रस्टकडून सध्या केले जात आहे. सदर काम पुर्ण होईपर्यंत देवीच्या मुख्य मूर्तीचे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. काम होईपर्यंत दर्शनासाठी उत्सव मूर्तीची सोय मंदिरासमोर करण्यात आलेली आहे.
दरम्यान ट्रस्टकडून हाती घेण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी भाविकांनी देणगी स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात मदत करण्याचे अवाहन तसेच भाविकांना दर्शन घेण्यास होणाऱ्या तसदीबाबत देवस्थानं ट्रस्टला सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.