दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : पुणे सातारा या महामार्गावर आनेवाडी गावच्या हद्दीतील टोलनाका व्यवस्थापनाने रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश भक्तांना मोफत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
राज्यासह परराज्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असलेले अनेक गणेशभक्त आपल्या कुटुंबियांसोबत कोकणात आपापल्या घरी जाण्यासाठी एसटी व खाजगी चारचाकी वाहने घेऊश महामार्गावरुन मोठ्या संख्येने जात आहेत.
अशा गणेशभक्तांना मोफत पिण्याच्या पाण्यांच्या बाटल्याचे वाटप करण्याचे आदेश आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन प्रमुख अमित भाटीया यांनी टोलनाक्यावरील टोल व्यवस्थापक रघुवीर सिंग संकेत गांधी, पांडुरंग पवार, अविनाश फरांदे, सचिन म्हातने व टोल कर्मचाऱ्यांना दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करत आज अखेर टोल प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.