विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच आपल्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. यावेळी बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. या स्वागतानंतर अजित पवार यांनी सभेत उपस्थिताना संबोधित केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार विनोदीशैली मध्ये भाषण करत असताना मिरवणुकीच्या मार्गावर झालेली गर्दी व कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत यावर बोलताना अजित पवार म्हणाले, एवढी ढकलाढकली, रेटारेटी या आधी आयुष्यात मला कुणी केली नाही.
अनेकांच्या हातात हात द्यायचो. ढकला ढकली होत होती. हातात हात देत असताना कार्यकर्ते म्हणत होते. दादा हात सोडा ढकलतायत, काहीं तर मुके, किसच घ्यायचे, मी म्हणालो, अरे, बायकोने सुद्धा कधी एवढे किस घेतले नाहीत, एवढे किस तर या कार्यकर्त्यांनी घेतले. काय चाललंय काय? या अजित पवार यांच्या विनोदी शैलीतील वाक्यामुळे उपस्थितांना हसू आवरले नाही.











