खेड -शिवापूर येथील श्री गणेश ज्वेलर्स एकूण 87 ग्रॅम वजनाचे सुमारे 4 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
नसरापूर: खेडशिवापूर ता हवेली या ठिकाणी (दि. 24 रोजी) बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटण्याची घटना घडली होती. यात सुमारे चार लाख रुपये किमतीचे ८७ ग्रॅम सोने चोरून नेले होते. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय 20 रा.भोसे ता.खेड जि. पुणे), शित्रुन गब्बर रजपुत (वय 21 रा.वाडे बोल्हाई ता.हवेली जि. पुणे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी शिवापूर (ता.हवेली जि. पुणे) येथील कोंढाणपूर रोडवरील धुकसिंग वागसिंग रजपुत (रा.शिवापूर) यांच्या श्री गणेश ज्वेलर्स या दुकानाजवळ 4 आरोपींनी फिर्यादीला पिस्तूलचा धाक दाखवून 87 ग्रॅम वजनाचे सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दोन मोटार सायकलवरून आलेले हे 4 जण पळून गेले. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल होता.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड, शित्रुन गब्बर रजपुत व इतर दोघांनी मिळून केल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांना चाकण येथून ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, फौजदार शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे प्रदीप चौधरी, हवालदार राजू मोमीन, अमोल शेडगे,
बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव यांच्या पथकाने केली.