पुणे : महान्यूज लाईव्ह
चांद्रयान तीन यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं आणि फक्त भारतातच नाही, जगातही भारताचे कौतुक झालं. या चांद्रयानाच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्राचंही मोठं योगदान राहिलेलं आहे. चांद्रयान तीन मोहिमेच्या यशस्वीतेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची माहिती दिली.
या मोहिमेत मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, वालचंदनगर, जुन्नर या शहरांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. मुंबईतील गोदरेज एरोस्पेस मध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टला कोटिंग करण्याचं काम करण्यात आलं.
पुण्यातील एका कंपनीमध्ये फ्लेक्स नोझल व बुस्टर तयार करण्यात आले. जळगावमध्ये एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलढाण्यामध्ये चांदी व थर्मल तर पुण्यातील जुन्नर तालुक्यातील दोन शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये गेली 50 वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेतील उपकरणे बनवली जातात. यावेळी उपकरणे बनवण्यात आली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली