सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : चांद्रयान -3 च्या माध्यमातून भारताने इतिहास घडविला. जगात भारताची अंतराळातील महाशक्ती देश म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनामुळे तसेच शास्त्रज्ञाच्या अथक प्रयत्नामुळे चांद्रयान-3 चा यशस्वी टप्पा संपूर्ण भारतवासी यांच्या साक्षीने पूर्ण झाला. याचा मला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
भारताचे चांद्रयान-3 आज बुधवारी चंद्रावर उतरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जगासह संपूर्ण भारत देशाच्या नजरा याकडे लागल्या होत्या.थेट प्रक्षेपणाद्वारे हे मिशन पाहण्याचा अनुभव भारतीयांनी घेतला. हर्षवर्धन पाटील यांनी चांद्रयान -3 मोहीमेचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ चांद्रयान-3 च्या यशस्वितेमुळे आंतराळातील महाशक्ती देश म्हणून जगात भारताची नवीन ओळख निर्माण झाली आहे. भारतीय विज्ञान, इंजीनियरिंग, औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्त्रोने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.