कॉपर चोरणाऱ्या सराईतास शिरवळ पोलिसांनी केले जेरबंद! कॉपर चोरीचा गुन्हा दोन दिवसात उघड..
चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत टोळीतील ३ आरोपी सह चोरीचा माल विकत घेणारा अटक. शिरवळ पोलीस ठाण्याची दमदार कामगीरी
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
खंडाळा : शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीतील निसार ट्रान्सफॉर्मर प्रा. लि. या ट्रान्सफॉर्मर निर्मीती करणाऱ्या कंपनीत तब्बल दहा लाख 58 हजार रुपयांचे तांबे चोरीला गेले होते पोलिसांनी युद्ध पातळीवर येतात तपास केला आणि चोरटे ताब्यात घेतले.
या घटनेत अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे (वय २४ वर्ष),स्वप्नील महेश गारुंगे (वय-२३ वर्ष),शिवाजी प्रभु तोरे (४२ वर्ष),विनायक बाळासो गोसावी (वय ४२ वर्ष) या तीन जणांना ताब्यात घेतले व गुन्ह्यातील वाहन पीकअप जीप व चोरीस गेलेला माल असा एकूण १३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ (ता. खंडाळा) हद्दीत असलेल्या एका कंपनीत १२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी ४ ते ५ चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करुन चोरी करून कंपनीत नवीन ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारा व पट्टया तसेच बॉबीचे बन्डल असा १० लाख ५८ हजार ४०० रुपये किमत असणारे १५१२ किलो वजनाचे तांबे चोरुन नेले.
याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व सदर गुन्हयातील चोरीस गेलेला माल किंमती असल्याने अनोळखी आरोपी यांचा शोध घेण्यासाठी शिरवळ पोलीस ठाण्याचे अधिकारी चिमाजी केंद्रे, फौजदार सतिश आंदेलवार, शंकर पांगरे, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, अजित बोराटे यांचे तपासपथक बनवून तपासाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस पथकाने वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रीक व गोपनिय महितीच्या आधारे कोल्हापूर येथून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा संशयितांनी तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून कोल्हापुर येथून रात्रीच्या वेळी गुन्हा घडल्याठिकाणी येऊन कंपनीतील कॉपर चोरुन कोल्हापुर येथे घेऊन गेल्याची कबुली दिली.
पोलिसांनी गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप व त्याचा चालक त्याचप्रमाणे गुन्हयातील चोरीस गेलेला माल विकत घेणारा यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला माल जप्त करणेत आला आहे. गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप जीप व चोरीस गेलेला माल असा मिळून सुमारे १३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरिक्षक चिमाजी केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक सतिश आंदेलवार, पोलीस उपनिरिक्षक शंकर पांगरे पोलीस उपनिरिक्षक अब्दुल बिद्री, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, अजित बोराटे यांच्या पथकाने केली.