प्रा. रविंद्र साबळे, इंदापूर (वाढदिवस शुभेच्छापर लेख)
इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री माननीय श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब तथा भाऊ यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
सुसंस्कृत,उच्चशिक्षित,संयमी व दूरदृष्टीकोन असणारे विकासात्मक व्यक्तिमत्व म्हणून माननीय श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आहे.
इंदापूर तालुका हे आपले कुटुंब मानून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ठेवीत तालुक्याचा चौफेर विकास केला आहे.
कृषी, औद्योगिक , व्यापार, शिक्षण, आरोग्य, क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची उभारणी शेतकऱ्यांसाठी नंदनवन ठरली आहे. एस.बी .पाटील शैक्षणिक संस्थेची उभारणी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवनवीन दालने त्यांनी सुरू केली. युवक वर्गाच्या कल्याणाकरिता लोणी देवकर येथे एमआयडीसीची उभारणी करून उद्योगांचे आगमन व रोजगार निर्मिती केली.दूधगंगाच्या माध्यमातून अमुल सारख्या कंपनीबरोबर करार करून ग्रामीण भागातील शेती व संलग्न व्यवसायाच्या विकासामध्ये त्यांनी मोठी भर घातली आहे.इंदापूर अर्बन बँकेच्या माध्यमातून शेतकरी, युवक आणि महिलांच्या आर्थिक उन्नती करता त्यांनी प्रयत्न केले.
मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी पाणीपुरवठा, बंधारा , रस्ते, वीज , आरोग्य , ग्रामीण विकास यासारख्या क्षेत्रात त्यांनी अत्यंत भरीव असे कार्य करून तालुक्याचा रचनात्मक विकास केला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा सतत उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक बंधाऱ्यांची निर्मिती करीत विविध धरणातील पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सततचा पाठपुरावा केला आहे, तसेच शेतीला वीज मिळावी यासाठी पहिल्यापासून वीज उपकेंद्रांची निर्मिती व वीज जोडणी उपक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
प्रसंगी शेतकऱ्यांना सवलतीत वीज उपलब्ध व्हावी त्यांची वीज तोडली जाऊ नये यासाठी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व सर्व सोयीयुक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी इंदापूर येथे उपजिल्हा रुग्णालयाबरोबर तालुक्यात विविध ठिकाणी सार्वजनिक आरोग्य सेवा उभारणे तसेच नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे.
तालुक्याला व शहराचा वैभव वाढावा यासाठी सुशोभीकरण आणि नागरिकांना मूलभूत सेवा उपलब्ध होण्यासाठी त्यांनी नियोजनात्मक प्रयत्न केला आहे.
इंदापूर तालुका सर्व क्षेत्रात आघाडीवर राहील यासाठी त्यांनी नियोजन करून विकासात्मक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. समाजातील सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकासाचे मोठे कार्य केले. अभ्यासू, शांत, कार्यकुशल, विकासात्मक नेतृत्व म्हणून माननीय श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्याकडे पाहिले जाते.