सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गागरगावचे पोलीस पाटील विकी ज्ञानदेव लोंढे (वय ३२ वर्षे, रा. लोंढेवस्ती, गागरगाव,ता. इंदापूर) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
विकी लोंढे यांनी गागरगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांचे वडील ज्ञानदेव भगवान लोंढे ( रा.लोंढेवस्ती, गागरगाव, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस ठाण्याच्या अकस्मात मयत दप्तरी या प्रकरणाची नोंद झाली आहे.