दौंड : महान्यूज लाईव्ह
पतीपासून नऊ वर्ष विभक्त असलेल्या डॉक्टर पत्नीला पती, दिर व सासूने मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली असा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मुलीच्या मित्रास बापाने शिवीगाळ केली, म्हणून मुलीने जाब विचारला, त्यावरून बापाने विभक्त असलेल्या बायकोला व मुलीला मारले अशा स्वरूपाची ही घटना घडली आहे.
संबंधित डॉक्टर महिला ही डॉक्टर पतीपासून नऊ वर्षापासून विभक्त असून पती, सासू व दिर ज्या ठिकाणी राहतात, तिथेच राहते. दरम्यान या महिलेच्या मुलीचा दिल्ली येथील मित्र घरी आला मुलगी, तिचा मित्र व पत्नी असे तिघेजण घरात असताना डॉक्टर पतीने मुलीच्या मित्राला शिवीगाळ केली.
यावेळी मुलीने बापाकडे कोणत्या अधिकारातून तुम्ही शिवीगाळ केली? असा जाब विचारला, त्यावरून चिडलेल्या डॉक्टर पतीने थेट पत्नीलाच मारहाण केली. दरम्यान मारहाण व आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार डॉक्टर पत्नीने दौंड पोलिसांकडे दिली. त्यावरून दौंड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली पती व सासू, दिरावर गुन्हा दाखल केला असून मारहाणीचाही गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.