जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड-पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता.भोर) येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील मुलगी व तिचे वडील बुडाले, त्यापैकी मुलगी सापडली, मात्र या घटनेत तिचा मृत्यू झाला. वडील मात्र अद्याप बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपाड (ता.भोर) येथील रिसॉर्ट च्या ठिकाणी पुणे येथील काही पर्यटक सलग सुट्ट्या असल्याकारणाने फिरण्यासाठी आले होते. त्याच ठिकाणी जवळील भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी ५ पर्यटक गेले होते अशी माहिती दिली जात असून, त्यापैकी दोन जण बुडाल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान या घटनेत मुलीला बाहेर काढण्यात आले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती तिला नजीकच्या दवाखान्यात तातडीने नेले असतात तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले दरम्यान अद्याप तिच्या वडिलांचा मात्र शोध लागला नाही. भोर पोलीस व प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य सुरू आहे.