दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या दारु, मटका आणि जुगार अड्ड्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्या होत्या, आज वाई पोलिसांनी जुगाराच्या छापा टाकत एका आरोपीला ताब्यात घेतले व ते पण हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
वाईच्या डीबी पथकाने पसरणीला जाणाऱ्या रस्त्यावर सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला आणि रोख रकमेसह 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाई पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, पसरणी रोड येथे एक इसम मटक्याचा अड्डा चालवत आहे, त्यांनी तातडीने फौजदार सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, हेमंत शिंदे, राहुल भोईर, प्रेमजीत शिर्के यांना मार्गदर्शन करुन त्या मटका अड्ड्यावर सापळा लावून छापा टाकण्याचे आदेश दिले होते.
वाई पोलिसांच्या या पथकाने या मटक्याच्या अड्ड्यावर सापळा रचून छापा टाकला असता, तेथून अशोक बजरंग पवार (रा. सिद्धनाथवाडी वाई) यास ताब्यात घेऊन, त्याच्याकडून सुमारे 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला .