दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या बसस्थानकाच्या आवारात वाई बालेघर एसटीच्या चाकाखाली सापडून वाई हायस्कूल मध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी कु. श्रावणी विलास आयवळे (वय १३ वर्षं) हिचा जागीच मृत्यू झाल्याने वाई तालुक्यात खळखळ उडाली आहे.
या गंभीर अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे आयपीएस परिविक्षाधीन अधिकारी असलेले कमलेश मीना, पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांनी अपघातस्थळावर तातडीने दाखल होऊन पाहणी केली.
या घटनेत अपघात केलेली बस व चालकाला पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे. दरम्यान एसटी महामंडळाने मृत श्रावणीच्या पालकांना तातडीची १० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे स्पष्ट केले. या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात करण्यात आली असून हा अपघात आज (शनिवारी)दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास वाईच्या बसस्थानकावर घडली