• Contact us
  • About us
Thursday, September 21, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किल्ले रोहिडेश्वर प्रवेशद्वाराजवळील तटबंदी ढासळली, खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्विट

Maha News Live by Maha News Live
August 12, 2023
in सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, Featured
0

जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह 

भोर : हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रोहिडेश्वर ( रोहिडा ) गडावर जाणाऱ्या प्रथमदर्शनीय प्रवेशद्वाराजवळील तटबंदीचा बुरुज पावसामुळे ढासळला आहे. भोरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुधवार, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळल्यामुळे गडावर पर्यटकांना जाणे अवघड झाले आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी ढासळण्याच्या अवस्थेत आहे, 

ढासळलेल्या तटबंदीचा दगडी, माती, चुनखडीचा राडारोडा हा पर्यटक ज्या वाटेने गडावर चढतात त्या वाटेवर आला असल्यामुळे गडावरील पायवाट बंद झालेली आहे. यावर बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबद्दल आपले ट्विट केले आहे 

काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे?

स्वराज्याची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रोहिडेश्वराच्या (रोहिडा) प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची डागडुजी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गडप्रेमी नागरीकांसाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. यासह इतिहासाच्या अभ्यासक व नागरीकांसाठी हा उज्ज्वल वारसा आहे. या वास्तुचे जतन व संवर्धन व्हायला हवे. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबत सकारात्मक विचार करुन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रोहिडेश्र्वर किल्ला 

हिंदवी स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा अतिशय समर्पक उपयोग करून मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले अशा शिवकाळातील रोहिडा किल्ला भोर तालुक्यातील बाजारवाडीजवळ आहे. ऐतिहासिक कागदपत्रातून याला ‘विचित्रगड’ व ‘बिनीचा किल्ला’ अशा नावानेदेखील संबोधले जाते. 

गडाची समुद्रसपाटीपासून उंची ११०५ मीटर म्हणजेच ३६२५ फूट आहे. बाजारवाडी गावापासून किल्ल्यावर चढण्यासाठी सर्वांत चांगली मळलेली पायवाट असून गडावर चढण्यासाठी एक तास लागतो. गडावर प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा असून, त्याची बांधकाम शैली अशी आहे की दरवाजा आपणास दिसून येत नाही. हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. प्रथमदर्शनी असलेल्या दरवाजाच्या चौकटीवर भक्कम गणेश पट्टी असून तिच्यावर मिहराब आहे. 

शासनाचे दुर्लक्ष

याच प्रवेशद्वाराच्या शेजारील असणारी तटबंदी बुरूज पावसामुळे ढासळला असल्यामुळे गडाचे ऐतिहासिक महत्त्व कमी झालेले दिसत आहे. शासन एकीकडे गडसंवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये ठराविक गडकिल्ल्यांसाठी खर्च करत आहे; परंतु जे किल्ले पुरातत्त्व खात्याकडे आहेत त्या किल्ल्यांसाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्याचे दिसून येत आहे.

गावकऱ्यांची गडाची दुरुस्तीची मागणी

इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्लेसंवर्धन फक्त कागदावरच असल्याचे एक उदाहरण असून, गडाच्या तटबंदीची दुरुस्ती करण्याची मागणी गडकरी शंकर धावले व चंद्रकांत भागवत यांनी केली आहे.

Next Post

दक्षिण कोरियातील सांस्कृतिक कार्यक्रमात बारामतीच्या ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांचा सहभाग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंकिता पाटील ठाकरे आता भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष!

September 21, 2023

महाराष्ट्रातलं बहुचर्चित राहणारं पार्टी ट्रस्ट यंदा सांगोल्यात बरं का!

September 21, 2023

प्रवीण माने तेथे दिसले..अन् सुरू झाली पुन्हा एकदा भैय्या नावाच्या वादळाची चर्चा..

September 21, 2023

इंदापुरात गावोगावी विकासपुरुषांचा हैदोस! ठेकेदारांना तर, भय कशाचे उरले नाही.. हा कसला विकास म्हणायचा?

September 21, 2023

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलकांचा खंडाळा घाटात दीड तास ठिय्या!

September 21, 2023

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आनेवाडी टोलनाका प्रशासनाने मोफत पिण्याच्या पाण्याच्या
बाटलींचे वाटप केले!

September 20, 2023

वातुंडे गावातील हॉटेल व्यावसायिक व कामगाराजवळ मिळून आला अवैध गावठी पिस्टल, काडतूसाचा साठा!

September 20, 2023

दौंड मध्ये महा-ई-सेवा केंद्रात चोरी झाली.. सीसीटीव्ही पाहतो तो काय, केंद्रातलीच महिला कर्मचारी निघाली..!

September 20, 2023

बारामतीत अजब घडलं! गणरायाच्या आगमनादिवशीच बापाचा वाढदिवस.. पोरांनी बापाला एक मोठं गिफ्ट दिलं.. चक्क एका ताऱ्यालाच बापाचं नाव दिलं..! 

September 20, 2023

माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी कोण? केशवबापूंच्या शेकडो समर्थकांनी गाठली देवगिरी!

September 20, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group