जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
रोहिडेश्वर किल्ल्याचा तटबंदी बुरुंज ढासळला. भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी (ता. भोर) येथील रोहिडेश्वर किल्ल्याचा प्रथमदर्शनी प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुंज ढासळला
बुरुंजाचे दगड, माती तसेच राडारोडा किल्ल्याच्या दरवाज्याच्या पायवाटेवर आल्याने गडावर जाणारी पायवाट बंद झाल्याची माहिती मिळत आहे. हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रोहिडेश्वर किल्ला आहे.
गडावर जाणाऱ्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराशेजारील तटबंदी बुरुंज पावसामुळे कोसळला असून गडावर महत्त्वाच्या पायवाटेवर दगडी, माती, घसरून आल्याने पायवाट बंद झाली आहे, तर काही ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी धोक्याची असल्याचे गडकरी शंकर धावले, चंद्रकांत भागवत यांनी सांगितले.