बारामती : महान्यूज लाईव्ह
पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या की, रस्ते निसरडे झाले म्हणूनच समजा! अनेक ठिकाणी अनेक रस्ते निसरडे होताना व या काळात अपघात होताना आपण पाहतो. आज बारामती शहरात सकाळी झालेल्या हलक्या पावसाने काही वाहने घसरली, मात्र यामध्ये बारामती माळेगाव रस्त्यावर घडलेल्या घटनेने एका बावीस वर्षीय कर्मचाऱ्यांचा मात्र जीव घेतला आणि त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं.
बारामतीतील येथील डेअरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बारामती माळेगाव रस्त्यावर घडली. अहमद इस्माईल शेख असे या 22 वर्षीय कामगाराचे नाव आहे. अहमद शेख हे सकाळी कामावर जात असताना कंटेनर चालकाने धडक देऊन या दुचाकीला काही अंतर फरफटत नेले.
यात अहमद शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा उपचारादरम्यान अहमद शेखचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या संदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांनी कंटेनरचालकावर भा.द.वि. कलम 279, 304 (अ), 337, 338, 427 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.