मुंबई : महान्यूज लाईव्ह
जेष्ठ लेखक विचारवंत फुले वादी नेते प्राध्यापक हरी नरके यांनी वयाच्या ६० व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एक जून 1963 रोजी जन्मलेले हरि नरके हे गेल्या वर्षभरापासून आजारी होते त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते आज मुंबईला त्यांना उपचारासाठी आणत असताना सकाळी सहा वाजताच दोन उलट्या झाल्यानंतर त्यांना एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते.
डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन असेही त्यांनी पुस्तक लिहिले. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी नरके आयुष्यभर कार्यरत राहिले.
त्यांच्या निधनाने समाजाची देशाची अपरिमित हानी झाली असून, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारा चळवळीची देखील मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.