दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
ऐतिहासिक वायूच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना आज दुपारी पावणे चारच्या दरम्यान घडली, जेव्हा वाईच्या सत्र न्यायालयात कोल्हापूरच्या कारागृहातून बंटी जाधव या कुख्यात गुंडाला सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या.
वाईस संपूर्ण सातारा जिल्हा हादरवणाऱ्या या घटनेमध्ये कुख्यात गुंड बंटी जाधव याच्यावर वाईच्या सत्र न्यायालयासमोर न्यायालयात फायरिंग करण्यात आले हे फायरिंग फिर्यादीने केल्याचा संशय असून फिर्यादीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बंटी जाधव याला सुनावणीसाठी कोल्हापूरहून वाई मध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. कोल्हापूर कारागृहात बंटी जाधव गेल्या काही महिन्यांपासून आहे. त्यातील सविस्तर माहितीसाठी अपडेट थोड्याच वेळात.!