सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लाकडी नजीकची वणवेवस्ती प्राथमिक शाळा.. दुपारचे साडेबारा वाजतात.. अन एक चारचाकी गाडी शाळेसमोर थांबते. थोड्याच वेळात मुलांना बाहेर आणलं जातं आणि त्यांना एक गिफ्ट मिळतं.. ते गिफ्ट पाहताच मुलांचे चेहरे हरकून जातात. काय असतं ते गिफ्ट?
लहान मुलांचे शिक्षण, महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण याविषयी अतिशय संवेदनशील असलेल्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य आणि आताचे कर्जत, जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून दरवर्षी राज्यभरातील विविध शाळांमध्ये लहान मुलांसाठी, शालेय देशातील युवा वर्गासाठी आणि दुसरीकडे महिलांच्या हाताला काम देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग याच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलता जपत मुलांमध्ये नाविन्य व कोणत्याही स्पर्धेला टिकण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी रोहित पवार करीत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळेच ते आमदार असलेल्या भागातच नव्हे, तर जिथे गरज आहे अशा ठिकाणी सातत्याने बारामती ॲग्रो ही कंपनी सामाजिक उतरदायित्वाचा भाग निभावते. त्याच्यातूनच हा एक प्रसंग होता वणवेवस्ती शाळेतील!
वणवेवस्ती शाळेत व अंगणवाडीत शिकणाऱ्या 56 मुलांना यावेळी बारामती ऍग्रोचे मनुष्यबळ विकास अधिकारी संजय सस्ते व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत स्कूल बॅग देण्यात आल्या. या देखण्या व मजबूत स्कूलबॅग पाहताच मुलांचे चेहरे हरकले. गेल्या काही वर्षांपासून बारामती अग्रो येथे विविध उपक्रम राबवत असून येथे वृक्षारोपणही करण्यात आल्याची माहिती येथील शिक्षकांनी दिली.