मुंबई : महान्यूज लाईव्ह
आलिशान कार किंवा महागड्या घरापेक्षा त्याची किंमत जास्त आहे. सॅमसंग कंपनीने बाजारामध्ये नवीन एक टीव्ही आणला असून 110 इंच स्क्रीन असलेल्या या टीव्हीची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच खिशाकडे हात लावून खात्री कराल, कारण या टीव्हीची किंमत तब्बल एक कोटी 15 लाख रुपये आहे.
आता तुम्ही म्हणाल असं काय आहे की या टीव्ही ची किंमत एक कोटी 15 लाख रुपये आहे? तर या टीव्ही मध्ये 24.8 दशलक्ष मायक्रोमीटर एवढे एलईडी लावलेले आहेत. जो टीव्ही तुम्हाला घरबसल्या चित्रपटगृहाचा फील देईल. मायक्रो एलईडी असल्यामुळे फक्त स्क्रीन दिसते. त्याला कोणत्याही प्रकारची बॉर्डर असणार नाही.
टीव्ही मध्ये डिस्प्ले आर्ट मोड चा ऑप्शन आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोटोग्राफी सुद्धा करू शकता. किंवा तुमच्या घराला आर्ट गॅलरी करू शकता. हा टीव्ही डॉल्बी सपोर्ट असून त्याला खालून, वरून आणि बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने स्पीकर आहेत. या टीव्ही मध्ये टायझन ऑपरेटिंग सिस्टीम असून वायफाय चे सहावे व्हर्जन, ब्लूटूथ चे 5.2 व्हर्जन असिस्टंट मिळतो. त्याच पद्धतीने वीस बीट ग्रे स्केल डेप्थ असलेला हा डिस्प्ले आहे.