बारामती : महान्यूज लाईव्ह
गुणवडी येथील महिलेला महिन्याला दीड हजार रुपयाची पेन्शन सुरू करून देतो असे सांगून काटेवाडीतील भामट्याने 13000 रुपये घेतले. व कोरे धनादेश घेऊन त्याचा गैरवापर केला. या 13000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात काटेवाडी येथील आदित्य संतोष पाटोळे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बारामती तालुक्यातील गुणवडी येथील संभाजी गणपतराव गावडे या 68 वर्षीय शेतकऱ्यांनी फिर्याद दिली. 25 जुलै ते 27 जुलै दरम्यानच्या काळात हा प्रकार घडला. पाटोळे येणे गावडे यांचा विश्वास संपादन करून गावडे व गावडे यांच्या पत्नीस प्रत्येकी महिना दीड हजार रुपयांची पेन्शन चालू करून देतो असे सांगून त्यासाठी 13000 रुपये घेतले.
त्यापैकी तीन हजार रुपये रोख व गावडे यांच्या मुलाकडून फोन पे द्वारे दहा हजार रुपये घेतले. एवढी रक्कम घेऊन शिवाय गावडे यांच्याकडील कोऱ्या धनादेशांचा गैरवापर केला अशी फिर्याद गावडे यांनी पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी सहायक फौजदार श्री जगदाळे पुढील तपास करत आहेत.