जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : पुणे सातारा महामार्गावर किकवी येथे एसटी बस आणि दुचाकीला भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.रविवारी दुपारी ही घटना घडली. त्यामध्ये एक जण जखमी देखील झाला असून या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
शंकर शिंदे ( वय ४८, रा. नावेचीवडी वाई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नाव आहे. तर रमेश चव्हाण, हा त्याच्यासोबत दुचाकीवर असणारा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून सातारच्या दिशेने जात होती. दुचाकीवरील दोघे किकवी येथून वाईकडे येत होते. किकवी येथील पुलावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात शंकर शिंदे जागीच ठार झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशन मध्ये झाली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.