• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या काळात बारामतीकरांनी मुंबईकरांपासून कमवले १ कोटी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे बारामतीत झाले वेबसिरीजचे शूटींग..!

Maha News Live by Maha News Live
September 13, 2020
in मनोरंजन, महिला विश्व, मुंबई, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

कोरोना सर्व क्षेत्रासाठी आपत्ती ठरली, मात्र मंदीत संधी शोधणाऱ्यांसाठी कोणतीही आपत्ती इष्टापत्ती ठरते, बारामतीकरांसाठी ती इष्टापत्ती ठरली.. ऑगस्ट महिन्यात जिथे बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत होते, त्याच काळात बारामती तालुक्यातील व्यवसायास मुंबईकरांनी हातभार लावला! तो कितीचा असेल?..तर तो होता, एक कोटींचा..!

मुंबईच्या प्रॉडक्शन कंपनीने बारामती तालुक्यात एक वेबसिरीज शूट केली, त्यातून हॉटेल, केटरिंग, हेल्पर, ज्युनिअर आर्टीस्ट, स्थळभाडे असे मिळून बारामतीकरांना १ कोटींचा जॅकपॉट लागला…!

बारामती तालुक्यातील ढाकाळे गावासह बारामती शहरातील प्राईम लोकेशनवरती एसओटी ( सर्जिकल स्ट्राईक टिम) या वेबसिरीजचे शुटींग ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान झाले. या शुटींगसाठी मुंबईतून ५० जणांची टिम आली होती. या पथकाची अगोदर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतरच त्यांना बारामतीतील मुक्कामाची परवानगी देण्यात आली होती.

बारामती तालुक्यातील ज्युनिअर आर्टिस्ट, हेल्पर, कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा जवळपास ४०० जणांचा यामध्ये सहभाग राहीला. या साऱ्यांना चांगल्या मानधनामुळे कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद असताना चांगले पैसे मिळाले. येथील हॉटेल व्यावसायिक, केटरींग व्यावसायिकांबरोबरच गेली सहा महिने वाहनांना भाडे मिळाले नव्हते, अशा अनेक वाहनांनाही भाडे मिळाले.

या वेबसिरीजचे बारामतीत शुटींग व्हावे यासाठी राहूल जगताप ढाकाळकर यांनी धडपड केली. सोनी लीव या वाहिनीवर ही वेबसिरीज चालणार आहे. भारत-पाकिस्तानमधील सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत ही वेबसिरीज आहे. क्लिक फ्लिक या पाचगणीच्या कंपनीने जगताप यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी त्यांना अपेक्षित असलेली लोकेशन्स विचारली होती.

जगताप यांनी दोन महिने सोशल मिडीयावर, मित्रांना याबाबत आवाहन केले होते. मुंबईतील कंपनीलाही ही लोकेशन्स आवडली. यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या संदर्भातील माहिती दिल्यानंतर त्यांनी बारामतीकरांना त्यातून काय मिळेल याची विचारणा केली व स्थानिकांना मिळणाऱ्या लाभानंतर त्यांनी याची परवानगी दिली. प्रशासनानेही यासाठी सहकार्य केले.

मुंबईतील बड्या अभिनेत्याची ही प्रॉडक्शन कंपनी असून या कंपनीची ही निर्मिती आहे. लवकरच ही वेबसिरीज छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

जवळपास १५ दिवसांत पेट्रोलपंपापासून ते हॉटेल पर्यंत व पुष्पहाराच्या दुकानदारांपासून ते छोट्या छोट्या व्यावसायिकांपर्यंत या सिरीजचा अनेकांना व्यवसाय वृध्दीसाठी लाभ मिळाला. या दरम्यान उद्योजक रणजित पवार, आमदार रोहित पवार, सोनाई कंपनी चे संचालक अतुल माने यांचेही या वेबसिरीजमधील कलाकारांना सहकार्य मिळाले.

कोरोनाच्या काळात अनेक व्यवसाय अभूतपूर्व मंदीचा सामना करीत आहेत, अशा काळात बारामती तालुक्यात १ कोटी रुपये आले, अर्थात बारामती तालुक्यातील लोकेशन्स, केव्हीके, बारामती शहर, तालुक्यातील अनेक गावे, नदींचे संगम अशा विविध ठिकाणांना मुंबईतील शुटींगसाठी स्थळे शोधून देणाऱ्या मध्यस्थ कंपन्यांचीही पसंती मिळाली असून यापुढील काळात बारामतीत अशा प्रकारची अल्पकालीन, दिर्घकालीन चित्रीकरण होऊ शकते असे मत राहूल जगताप ढाकाळकर यांनी व्यक्त केले.

Next Post
गृहमंत्री अमित शहांची प्रकृती पुन्हा बिघडली; एम्स रुग्णालयात दाखल

गृहमंत्री अमित शहांची प्रकृती पुन्हा बिघडली; एम्स रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group