दोन मृतदेह मिळाले परंतु तिसरा युवक अजूनही बेपत्ताच; शोधकार्य सुरू
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : शनिवारी सुट्टी मिळाली म्हणून भोर ते महाड रस्त्यावर फिरायला जायचे असे त्या ठिकाणी ठरवले सोबतीला आयटी कंपनीतीलच युवती देखील होती. तालुक्यातील वरंधा घाटमार्गे महाडकडे जाताना वारवंड – शिरगाव हद्दीतील घोडेमैदान वळणावर धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही व ३०० फूट खोल नीरा – देवघर धरणाच्या पाण्यात बलेनो एमएच १४ एचडी ३९८४ कोसळली. या घटनेने आज भोर तालुका आणि पुणे शहराला सुन्न करून टाकले.
पावसाळ्यात पर्यटकांसह हौशी लोक फिरायला बाहेर पडतात थोडीशी चूक अशा काळात आयुष्यापासून आपल्याला दूर करते. पुण्यातील अक्षय धाडे, हर्षप्रीत बाबा या दोघांना तर त्याचा अनुभव आलाच, परंतु तिसरा युवक अजूनही सापडलेला नाही. गाडीतील चौघा जणांपैकी एक जण सुदैवाने बचावला आणि त्याने सारी आपबिती सांगितली.
बलेनो गाडीतून पुण्याहून वरंधा (ता.भोर) घाटमार्गे एका तरुणीसह तिघेजण महाडकडे जात होते. घाटातील शिरगाव-वारवंड हद्दीतून जात असताना महेश धाडे हा गाडी चालवत होता अशी माहिती या घटनेतील वाचलेला संकेत वीरेश जोशी याने पोलिसांना दिली. गाडी भरधाव वेगात होती आणि धुके दाटलेले होते. तीव्र वळणावर धुक्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि नीरा – देवघर धरण पात्रात गाडी कोसळली.
गाडी खाली पडत असतानाच गाडीचा दरवाजा कसातरी उघडून संकेत विरेश जोशी रा. बाणेर ( मूळ गाव गुजरात) हा तरुण गाडीतून बाहेर गेल्याने बचावला. त्याला थोडीफार जखम झाली पण तोपर्यंत गाडी पाण्यात पडली होती गाडीत बसलेल्या इतर तिघांना या गाडीतून बाहेर पडता आले नाही हे संकेत जोशी पाहत होता, परंतु त्याला एक जखम झाल्याने होतो दूर अंतरावर असल्याने त्यालाही बचाव करता आला नाहीतर.
यावेळी गाडी चालक अक्षय रमेश धाडे वय -२७ रा. रावेत, स्वप्निल परशुराम शिंदे (वय – २८ रा.हडपसर पुणे) व तरुणी हर्षप्रीत हरीप्रीतसिंग बांबा ( वय – ३०)पाषाण पुणे, मूळ रा. जबलपूर) हे तिघेही गाडीत अडकून पडले. मग संकेत जोशी हा घाटमाथ्यावर आला आणि त्याने रस्त्याने जाणाऱ्यांना थांबवून मदतीसाठी हाका मारल्या काही लोक स्थानिक असल्यामुळे त्यांनी तातडीने घटनास्थळाची माहिती पोलिसांना तसेच इतरांनाही दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर बचाव पथक पोहोचले स्वयंसेवक पोचले आणि त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली दरम्यान दुपारपर्यंत महेश धाडे व हर्ष प्रीत बाबा या दोघांचे मत देह ताब्यात आले परंतु यातील स्वप्निल शिंदे अजूनही बेपत्ता असून शोध सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच भोईराज जल आपत्ती पथक, सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर- पुणे, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक रेखा वाणी, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील,शिरगाव, वारवंड, कोंढरी येथील पोलिस पाटील व स्थानिक ग्रामस्थ, फौजदार श्रीकांत जाधव, हवालदार दत्तात्रय खेंगरे, उद्धव गायकवाड, विकास लगस, अतुल मोरे, सादिक मुलाणी, भीमराव रनखांबे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरू केले.
दरम्यान प्रशासनाने वरंध घाट परिसरात वाहतुकीस व पर्यटनास बंदी घातली असली तरी प्रवासी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. दुसरीकडे बांधकाम विभागाने त्या ठिकाणी घाट परिसरात रस्त्याच्या कडेला सुरक्षेच्या साठी कठडे बंधने अपेक्षित असून प्रशासकीय बांधकाम अधिकारी याकडे दर्लक्ष करीत आहेत.