जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : पुण्याहून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर दाट धुक्यामुळे बलेनो कार नीरा देवघरच्या पाण्यात कोसळल्याची घटना घडली. कारमधील तिघा जणांचा मृत्यू तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.
आज सकाळी ही घटना घडली असून, या ठिकाणी कार आणि कार मधील प्रवासी शोधण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक मदत कार्य करीत आहेत आज सकाळी ही घटना वरंधघाट मार्गे कोकणात उतरणाऱ्या मार्गावर घडली मारुती सुझुकीची बलेनो कार घेऊन पुण्यातील बाणेर मधील चार मित्र कोकणात उतरत होते निरा देवघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात त्यांची गाडी कोसळली.
स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) असं बचावलेल्या युवकाचे नाव असून तिघेजण मृत पावलेले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.