धनगर एसटी आरक्षणप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी जे केले.ते अजितदादांनीही करून दाखवावे. विक्रम ढोणे यांचे आवाहन बारामतीत जवाब दो आंदोलन!
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामतीत आज धनगर समाज विवेक जागृती अभियानाच्या वतीने प्रशासकीय इमारतीसमोर धनगर आरक्षणाच्या संदर्भात विश्वासघात आंदोलन करण्यात आले. ९ वर्ष धनगर आरक्षणाच्या फसवणुकीची असं म्हणत धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने आज येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना गेल्या महिन्यात बारामतीत आणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून धनगर समाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. त्या कार्यक्रमात एसटी आरक्षणाबाबत भरभरून आश्वासने देण्यात आली.त्यानंतरच्या घडामोडीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत गेला असल्याने एसटी आरक्षण प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी स्थानिक कुरुबा (धनगर) समाजाचा एसटी समावेशासाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली, तशी प्रक्रिया महाराष्ट्रातही घडवून आणावी,असे आवाहन धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर धनगर विवेक जाग्रती अभियानाच्यावतीने जवाब दो धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी ढोणे यांनी ही भुमिका मांडली. एसटी आरक्षणप्रश्नी बारामती येथे जुलै २०१४ मध्ये ऐतिहासिक आंदोलन झाले. या आंदोलनासाठी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे २२ जुलै रोजी बारामतीत आले होते.
भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करू,असे आश्वासन फडवणीस यांनी दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून धनगर बांधवांनी एकतर्फी मतदान भाजपला केले व भाजपला सत्ता मिळाली,तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय होऊ शकला नाही. फडणवीस यांनी आश्वासन दिलेली २९ जुलै ही तारीख आम्ही विश्वासघात दिवस म्हणून पाळत आहोत. यानिमित्ताने धनगर एसटी आरक्षण प्रश्नी राज्य शासनाने केलेल्या सकारात्मक कार्यवाहीबाबतचे उत्तर आम्हाला हवे आहे. असे ढोणे यांनी म्हंटले आहे.
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत समाजाच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. सातत्याने संभ्रमित केले जात आहे. गेल्याच महिन्यात बारामती येथे अजितदादा समर्थक कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी जयंतीचा सोहळा घेतला. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि धनगर नेते सिद्धामय्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने धनगर समाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. बहुतेक सर्व नेत्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे शक्य असल्याचे सांगितले.
२०१४ सालीच शरद पवार हे आरक्षण देणार होते, असेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात आणि कर्नाटकात महत्वपुर्ण घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत तर कर्नाटकातील कुरुबा धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी सिद्धरमय्या सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस पाठवली आहे. कर्नाटकातील शिफारस हा देशभरातील धनगर समाजासाठी आनंदाचा विषय आहे. त्यादृष्टीकोनातून महाराष्ट्रातील प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा आहे.
अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षात आरक्षणप्रश्नी डोक्याला पिवळा फेटा बांधून आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना याप्रश्नाची जाण आहे, असे आम्ही मानतो. बारामतीतील कार्यक्रमात अजितदादांच्या भगिणी खासदर सुप्रिया सुळे यांनी याप्रश्नी संघर्ष करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनगर समाजाविषयी कृतीशील प्रेम दाखविणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत अजित पवार यांचे भाजप श्रेष्ठींकडील वजन पाहता ते याप्रश्नी निर्णायक भुमिका बजावू शकलात, असा आम्हाला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सिद्धरमय्यांचा आदर्श घेऊन धनगर समाजाचा प्रश्न धैर्य दाखवावे, असे आवाहन ढोणे यांनी केले..
आंदोलनाच्या निमित्ताने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने काढावी, तसेच मंत्री समिती स्थापून राज्य आणि केंद्र सराकरमध्ये समन्वय करावा. अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.