लखनौ : महान्यूज लाईव्ह
आपल्या देशातील कायद्याची सिस्टीमच अशी झाली आहे की, चोर सोडून सावाच्या मागे एवढे पळायचं की, सावाचासुद्धा मृत्यू झाला पाहिजे. लुधियाना मधील एका ट्रक चालकाचा अशाच प्रकारे जीव गेला. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून जीएसटी विभागातील दोन अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा लागला.
जीएसटी अधिकाऱ्यांची ही मनमानी कानपूर मध्ये घडली. लुधियानातून कानपूर मधून लुधियानाकडे भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. कर चुकवेगिरीच्या संशयावरून या ट्रक चालकाला पकडण्यात आले होते. अर्थात हा ट्रकचालक अत्यंत लगबगिने निघाला होता. त्यामुळे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयाला परंतु प्रत्यक्षात ट्रॅक्टर चालकाच्या धाकट्या मुलाचा मृत्यू वीजेचा धक्का लागून लुधियानामध्ये झाला होता.
त्यामुळे हा ट्रकचालक लगबगीने निघाला होता. कर चुकीगिरीचा संशय असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला जीएसटी विभागाच्या लोकांमध्ये ठेवले. त्याने अनेकदा विनवण्या केल्या. घरच्यांशी बोलणेही करून दिले, पण अधिकाऱ्यांनी काय मानले नाही आणि त्याला सोडले नाही. अखेर मुलाच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्याचाही प्राण गेला.
यानंतर मात्र त्याच्या कुटुंबीयांनी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोठडीमध्ये मारहाण केल्यामुळे बलबीर सिंग यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 23 जुलै रोजी जीएसटी विभागाच्या कार्यालयात कानपूर मध्ये या ट्रकचालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणावरून दोन जीएसटी अधिकारी आणि तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलबीर सिंग असे या ट्रक चालकाचे नाव असून 20 जुलै रोजी कानपूर येथून गोविंदगडला ते भंगार घेऊन निघाले होते. 21 जुलै रोजी बलवीर यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती फोनवरून मिळाली. परंतु त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला आपला ट्रक कानपूर येथे राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी यांनी पकडून बलभीम यांचा फोनही जप्त केला होता अशी माहिती दिली.
बलबीर यांचा मृत्यू जीएसटी विभागाच्या कोठडीतच झाला. कारण बलबीर यांचा ट्रक जीएसटी कार्यालय बाहेरच उभा होता. 23 जुलै रोजी संध्याकाळी बलबीर यांच्या मृत्यूची माहिती ट्रकमालकाला देण्यात आली. ट्रकच्या केबिनमध्येच बलभीम यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तपासादरम्यान बलबीर यांची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र बलवीर यांचा मृत्यू कसा झाला याची माहिती समोरू आले नाही बलवीर यांच्या मुलाने या अधिकाऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.