बारामती : महान्यूज लाईव्ह
देशाच्या स्वातंत्रदिनानिमित्ताने बारामतीच्या रेडिओ रागिणीकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ देश माझा ‘ या राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेसाठी इ. ५ ते ७ वी आणि इ. ८ ते १० वी असे दोन गट केले गेले आहेत. प्रत्येक गटातून पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे दिली जाणार आहेत. अनुक्रमे रु. १०००, रु. ७५० आणि रु. ५०० रोख असे बक्षिसांचे स्वरुप असून सोबत ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रकही दिले जाणार आहे.
माझे स्वातंत्र्य माझी जबाबदारी, मतदान एक पवित्र दान, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, आणि… भारत स्वतंत्र झाला, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नारीशक्तीचे योगदान हे या स्पर्धेसाठीचे विषय आहेत. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी वरील विषयांपैकी एका विषयावर आपला ३ ते ५ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून रेडिओ रागिणीकडे पाठवायचा आहे. या व्हिडिओंचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकास सहभागाचे ई सर्टिफिकेट दिले जाणार असून या स्पर्धेसाठी रु. १०० इतके प्रवेशमुल्य आहे.
बारामतीतील एक्सलन्स सायन्स अॅकॅडमी हे या उपक्रमाचे प्रायोजक असून अधिक माहितीसाठी ९१४६१७७६४५ किंवा ९८८१०९८१३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.