दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी किकली येथील अतुल मोहन बाबर याच्यावर भुईंज पोलिसांनी ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
किकली गावचा रहिवासी असलेल्या अतुल मोहन बाबर याने एका २८ वर्षीय महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने जबरी बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची माहिती बाबर याला समजताच त्याने गावातून पलायन केले.
दरम्यान भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी अतुल मोहन बाबर याला पकडण्यासाठी एक पोलीस पथक तयार केले असून, ते पोलीस पथक तांत्रिक तपास व इतर तपासाच्या माध्यमातून अतुल बाबर याचा ठावठिकाणा शोधत आहेत.