पुणे – महान्यूज लाईव्ह
पुणे तिथे काय उणे अशी जी म्हण आहे, त्यात भर घालणारी घटना निगडी प्राधिकरणाजवळ घडली. या घटनेची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. निगडी परिसरातील मूकबधीर शाळेच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह च्या फेसबुक पेजवर पाहू शकता
निगडी परिसरात राहणारे निलेश पाटील हे शाळेच्या पाठीमागच्या परिसरात फिरत होते. ते चालत असतानाच शॉर्टकट मारायच्या नादात दलदल असलेल्या शेतात फसले. त्यांच्या लक्षातच ही दलदल आली नाही आणि ते बाहेर निघायच्या नादात चक्क कमरेपर्यंत रुतले.
अगदी काही वेळातच नागरिकांच्या लक्षात ही बाब आली म्हणून बरे झाले. त्यांनी तातडीने अग्नीशमन दलाला पाचारण केले. माहितीनंतर काही वेळातच अग्नीशमन दलाचे पथकही तेथे पोचले. मग बाबांना दोर, शिडी व हुकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
सध्या पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी दलदल निर्माण होते. अशावेळी काळजी घेण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी मोठे खड्डे असलेले लक्षात येत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणची पूर्ण माहिती नाही, अशा रस्त्याने पावसाळ्यात जाताना काळजी व सावधानता बाळगण्याची गरज आहे.