मुंबई – महान्यूज लाईव्ह
मणिपूर घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. सरकारला मणिपूरप्रश्नी आम्ही कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, नाहीतर आम्हीच पावले उचलू असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड म्हणाले आणि आजवर सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही विधानाला कोणीही बोलत नव्हते, तो पायंडा मोडत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले, त्याची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर चक्क कशाला हव्यात निवडणूका व संसद? असा प्रश्न केला. सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल, तर सकर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणूका आणि संसद? असा प्रश्न केला.
त्यावर चर्चा झाली नाही, तरच नवल. शिवसेनेचे नेते व विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लागलीच टिका केली. त्यांनी ट्विटला प्रत्युत्तर देताना तुम्ही कोण, तुमची पात्रता काय आणि थेट सर्वोच्च न्यायालयावर बोलत आहात. पण पोटातले ओठावर आले तुमच्या. कशाला हव्यात निवडणूका आणि संसद हेच तर हवंय ना महाशक्तीला? असे स्पष्ट करीत जोरात टोला मारला.