विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : शारदाबाई पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय बारामती येथील शारदानगरमध्ये फलटणच्या कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने आयोजित कॅम्पस मुलाखतीतून ४१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने मनुष्यबळ विकास अधिकारी अर्चना धायगुडे, सॅमेल नाॅर्टन व मनीष कुमार यांनी अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचीही मुलाखत घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. या निवडीबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदाताई पवार, सीईओ निलेश नलावडे, एच.आर. गार्गी दत्ता, प्राचार्य विजय चांदगुडे, समन्वयक प्रशांत तनपुरे आदींनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन रणजीत पोतेकर, दत्तात्रय इंगळे व शैलेश बोबडे यांनी केले होते.