शिरूर : महान्युज लाईव्ह
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच वाहतूक समस्या,महिला सुरक्षितता या बाबींना प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी बोलताना सांगितले.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे बलवंत मांडगे यांची मंचर पोलिस स्टेशन येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महेश ढवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रांजणगाव पोलिस स्टेशन चा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पुणे नगर महामार्गावर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत अपघातांचे प्रमाण लक्षणीय असून अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे.रस्त्यावर अवजड वाहतूक असून मोठ्या कंटेनर चालकांनी रस्त्याच्या कडेला कंटेनर न थांबता सुरक्षित ठिकाणी ते थांबवण्यात यावे. अपघात प्रवणक्षेत्र असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली जाणार असून त्या प्रश्नांसंदर्भात बांधकाम विभागास अवगत केले जाईल.
औद्योगिक सुरक्षिततेबाबत जर ठेकेदारी,माथाडी अथवा अन्य कोणी धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची गय केली जाणार आहे.याबाबत कंपनी एच आर शी चर्चा करण्यात येईल. दहशत निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास जरब बसवण्यासाठी योग्य ते पावले उचलली जातील. कंपन्यांमध्ये महिला कामगार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. रात्रपाळी असो अथवा दिवस पाळी, शिफ्टनुसार काम करणाऱ्या महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पोलिस स्टेशनच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.
रांजणगाव हद्दीत असणाऱ्या काही गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून प्रत्येक गावांत सीसीटीव्ही बसविणे,ग्रामसुरक्षा दल सक्षमीकरण करणेसाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जाईल.रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत जर चुकीच्या गोष्टी घडत असतील तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी कोणासही पाठीशी घातले जाणार नाही. कठोर कारवाई करत औद्योगिक शांतता ठेवण्यासाठी आगामी काळात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महेश ढवाण यांनी केले आहे.