बातमी गुजरात मधील अहमदाबादची आहे. आज पहाटेच्या सुमारास अहमदाबाद मधील इस्कॉन ब्रिजच्या रस्त्यावर थार जीप आणि एका डंपरची जोरात धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, लोक लागलीच हा अपघात पाहण्यासाठी धावले, मात्र अपघात पाहण्यासाठी धावलेल्या लोकांना पाठीमागून जोरात आलेल्या जग्वार कारने जोरात ठोसा दिला आणि त्यात तब्बल नऊ जणांचा जीव गेला.
ही जगवार गाडी डबल 160 किलोमीटर वेगाने धावत होती आणि तेवढ्याच वेगाने अपघात स्थळी जमलेल्या लोकांवर आदळली आणि एका क्षणात नऊ जणांचा जीव गेला. या घटनेत आणखी 15 जण जखमी झाले असून मृतामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि होमगार्ड शिपायाचा देखील समावेश आहे.
या अपघातातील जखमींना तातडीने स्थानिक सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. यापूर्वी देखील असाच अपघात दिल्ली मेरठ द्रूतगती महामार्गावर ११ जुलै च्या दरम्यान घडला होता.