दौंड महान्यूज लाईव्ह
भाजपने दौंडला आणखी ताकद देताना वासुदेव काळे यांना पुण्याचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. वासुदेव काळे यांची पुण्याच्या बारामती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. तर दुसरीकडे मावळ विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. भाजपने आज राज्यातील सर्वच भाजप जिल्हाध्यक्ष पदलले आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांचे कोण अध्यक्ष?
यामध्ये पुणे जिल्ह्याचे तीन विभाग करून तीन जिल्हाध्यक्षपदे जाहीर केली. सांगली शहराध्यक्षपदी प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निशिकांत भोसले पाटील, सोलापूरच्या ग्रामीण विभागासाठी सचिन कल्याणशेटटी, शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे तर माढा विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार-सावंत यांची नियुक्ती केली आहे.
ठाणे व कोकण विभागात भिवंडीसाठी अॅड. हर्षल पाटील, मिरा-भाईंदरसाठी किशओर शर्मा, नवी मंबईच्या अध्यक्षपदी संदीप नाईक, कल्याणसाठी नरेंद्र सूर्यवंशी, उल्हासनगरमध्ये प्रदीप रामचंदानी, वसई-विरारसाठी मरेंद्र पाटील, पालघरकरीता भरत राजपूत, सिंधुदुर्गसाठी प्रभाकर सावंत, उत्तर रत्नागिरीसाठी केदार साठे, दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत, तर उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी, दक्षिण रायगडकरीता धैर्यशील पाटील यांची नियुक्ती केली आहे. ठाणे शहराध्यक्षपदी संजय वाघुले, तर ग्रामीण साठी मधुकर मोडपे यांची नियुक्ती केली आहे.
संभााजीनगर शहराध्यक्षपदी शिरीष बोराळकर, संभाजीनगर उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून सुहास शिरसाट,दक्षिण संभाजीनगरसाठी संजय खांबायते, लातूर शहराध्यक्षपदी देविदास काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव देशमुख, धाराशिव जिल्हाध्यक्षपदी संताजीराव चालुक्य यांची नियुक्ती केली आहे.
उत्तर नांदेडसाठी दिलीप कंदकुर्ते, उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी सुधाकर भोयर, दक्षिण नांदेडसाठी संतुकराव हंबर्डे, परभणी शहराध्यक्षपदी राजेश देशमुख तर ग्रामीणसाठी संतोष मुरकुटे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फुला शिंदे, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बद्री पठारे(दानवे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर शहराध्यक्षपदी बंटी कुकडे, ग्रामीण करीता सुधाकर कोहळे, वर्ध्यासाठी सुनील गफाट, भंडारा जिल्हाध्यक्षपदी प्रकाश बाळबुधे, गोंदियासाठी अॅड. यशुलाल उपराळे, गडचिरोलीसाठी प्रशांत वाघरे, चंद्रपूर शहराध्यक्षपदी राहूल पावडे, ग्रामीण साठी हरिश शर्मा, बुलढाण्यासाठी गणेश मांटे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
खामगाव साठी संचिन देशमुख, अकोला शहराध्यक्षपदी जयंत मसणे, अकोला ग्रामीण साठी किशोर मांगटे, वाशिम साठी शाम बढे, अमरावती शहराध्यक्षपदी प्रविण पोटे, ग्रामीण साठी डॉ. अनिल बोंडे, यवतमाळ साठी तारेंद्र बोर्डे, पुसदसाठी महादेव सुपारे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.