दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथे गजबजलेल्या भर चौकात सोने चांदीचे ए. बी. सराफ दुकान अज्ञात चोरांनी फोडले. अंदाजे ७० ते ७५ लाखांचा चांदीचे आणि सोन्याचा ऐवज लंपास केल्याची बुधवारी ( दि .१९) घटना घडली.
वरवंड येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ आणि भर चौकात असलेल्या ए. बी. सराफ (अकलूजकर) यांच्या सराफ दुकानाचे शटर अज्ञात चोरांनी कटर च्या साह्याने तोडून दुकानातील अंदाजे ५० किलो चांदी व अर्धा किलो सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वरवंड परिसरात खळबळ माजली आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलीस कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी गाव घेतली. तसेच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक दुकानदाराची चर्चा करून सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली. या चोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विशेष शाखेचे पथक व यवत पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तपासण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. लवकरच या अज्ञात चोरांना जेरबंद केले जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.