पुणे ::महान्यूज लाईव्ह
उभारीच्या काळात ज्यांच्या एका छबीसाठी प्रचंड गर्दी व्हायची; ज्यांच्या चित्रपटाने महाराष्ट्राला मोहिनी घातली असे रवींद्र महाजनी दोन दिवसापूर्वी मृत्यू होतात आणि दोन दिवसानंतर कळत हे किती दुर्दैव?
मराठी चित्रपट सृष्टीचा देखणा हिरो अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी त्यांच्या पुण्यातील आंबी येथील घरात मृतावस्थेत आढळून आले. दोन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
गेल्या सात आठ महिन्यापासून रवींद्र महाजन हे घरात एकटेच होते. त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता असे सांगितले जात होते. बांधकाम क्षेत्रात उतरल्याने त्यांच्यावरती हा कर्जाचा मोठा डोंगर भागीदारांच्या फसवणुकीमुळे उभा राहिल्याचे सांगितले जात होते.