दौंड : महान्यूज लाईव्ह
प्रेमसंबंध ठेव, नाहीतर तुला, तुझ्या नवऱ्याला आणि होणाऱ्या बाळाला जीव मारेल. अशी धमकी देत चुलत दिराने भावजयीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पिडीत महिला गंभीर जखमी झाली असून दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
दौंड तालुक्यातील पूर्व भागात ही धक्कादायक घटना घडली. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. गुरुवारी (दि १३) ही घटना घडली असून या प्रकरणी चुलत सासू व दोन चुलतदिरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. पीडित महिलाही घरी एकटीच असताना घरातील झाडलोटीचे काम करीत असताना चुलत दिर, चुलत सासू हे तिघेजण घरी येऊन विनाकारण भांडण व वाद करू लागले त्यावेळी संबंधित पिडीत महिलेने माझे पती आता घरात नाहीत तुम्ही माझेशी वाद घालु नका असे म्हणाली.
तिने पतीस फोन करून घरी बोलाविण्यासाठी फोन केला असता, त्यावेळी चुलत दिराने तुला जर येथे रहायचे असेल, तर तु माझेशी प्रेमसंबंध ठेव. नाहीतर तुला व तुझे नव-याला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला खल्लास करून टाकू अशी धमकी दिली. तसेच दुसऱ्या चुलत दीर व चुलत सासूने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पोटावर लाथा मारल्या. तुला आता जिवंत ठेवत नाही, तुला खल्लासच करतो असे धमकी देत तलवारीने डोक्यावर मारत असताना डावा हात मध्ये घातला असता हातावर वार बसला.
या पीडित महिलांने आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक जमा झाल्याने हे तिघेजण शिवीगाळ दमदाटी करून निघून गेले अशी फिर्याद संबंधित पिडीत महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. सध्या या पीडित महिलेला दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने प्राण घातक हल्ला करणे व विनयभंग करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी हे करीत आहेत.