बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या शेतकऱ्यांकडील शेतमालाच्या लिलावात या आठवड्यात ज्वारीने चांगलाच भाव खाल्ला आहे. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकऱ्याने आणलेल्या ज्वारीला सोमवारच्या लिलावात तब्बल प्रतिक्विंटल 601 रुपये एवढा दर मिळाला.
सोमवारी झालेली लिलावात ज्वारीच नव्हे तर मक्याला देखील 2771 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर बाजरी, हरभरा, तूर, उडीद या शेतमालाची ही बाजार समितीत आवक चांगली झाली. बाजरीला अडीच हजार रुपयांचा दर, उडीद 8 हजार 140 रुपये प्रतिक्विंटल तर तुरीला 9 हजार 11 रुपये एवढा लिलावात दर मिळाला.
गव्हाला देखील प्रतिक्विंटल तीन हजार रुपयापर्यंत लिलावात दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने ज्वारीला दर चांगला मिळत असून, माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील हनुमान तरटे यांच्या ज्वारीची गुणवत्ता चांगले असल्याने त्याला दर चांगला मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी बाळासाहेब फराटे, महावीर वडूजकर, मिलिंद सालपे, जगदीश गुगळे, अशोक भळगट, सतीश गावडे, शशिकांत सालपे, दीपक मचाले यांनी या लिलावात भाग घेतला दरम्यान सध्या आवक झालेल्या शेतमाला चांगला दर असल्याने शेतकऱ्यांनी देखील शेतमाला आणताना स्वच्छ व प्रतवारी करून आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अरविंद जगताप यांनी देखील ज्वारीच्या चांगल्या दराची किंमत अजून काही दिवस कायम राहील असे मत व्यक्त केले आहे.