शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे आणि नगर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे टाकत गुन्हे करून पसार होणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत २९४ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
शिरूर तालुक्यासह पुणे- नगर जिल्ह्यात काही दिवसांपासून दरोडे तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेची ६ ते ७ पथके गुन्ह्याची तपास करत होते. काही गुन्ह्यांचा छडा लावायचा असा चंगच पोलिसांनी बांधला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत असताना अजय उल्हास काळे (रा. कडूस, पारनेर, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास केला असता, तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी गणेश सुरेश भोसले (वय.२८) यास ताब्यात घेतले व अंगझडती घेतली.
यावेळी आरोपीकडे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक बदाम, चोरलेली युनिकॉर्न गाडी, घड्याळ, ब्रेसलेट असा ऐवाज मिळून आला. तसेच त्याच्याकडे वेळोवेळी दरोडे, जबरी चोरी, घरफोडी यातून चोरलेले दागिने किरण बेंद्रे या सरफास विकल्याचे पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी बेंद्रे यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे चोरीच्या मालापैकी २९४ ग्रॅम वजनाचे एकूण १७ लाख ६४ हजार रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला.
आरोपी अजय काळे, गणेश भोसले, पावल्या काळे, तुषार काळे, शरद काळे यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींवर आळेफाटा,शिक्रापूर, शिरूर, नारायणगाव, दौंड, रांजणगाव, बेलवंडी, पारनेर या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
हा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, फौजदार गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद- पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, पो. हवा. सचिन घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापकीर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे, चंद्रकांत जाधव, अभीजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, पो.ना. बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, सहा. फौज. काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, पो.कॉ. दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक निरीक्षक नितीन अतकरे, निखील रावडे, श्रीमंत होनमाने यांनी केलेला आहे.